BIG NEWS : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी

Photo of author

By Sandhya

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आज (दि.२२) गुन्हा नोंद झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज राय ( Rahul Gandhi Threatening to kill ) असे असून, तो मूळचा गोरखपूरचा रहिवाशी आहे. अशी माहिती लखनऊ पोलिसांनी दिली असल्याचे वृत्त ‘एएनआय’ ने दिले आहे.

२५ मार्च राेजी मिळाली  हाेती धमकी राहुल गांधी यांना यावर्षी २५ मार्चला एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली होती. काँग्रेस मीडियाचे संयोजक लल्लन कुमार यांच्या फोनवर ही धमकी आली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.

यानंतर लल्लन कुमार यांनी लखनऊच्या चिन्हाट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेत, ही कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती देखील लखनऊ पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment