नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड

Photo of author

By Sandhya


नीरा : पुरंदर तालुका आणि त्याचबरोबर बारामती तालुक्यातील 36 गावांसाठीच कार्यक्षेत्र असलेल्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड आज करण्यात आली.सासवड येथील उप बाजारातील कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पारपडली.यामध्ये काँग्रेसचे संदीप फडतरे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या अजित पवार आणि संजय जगताप यांचे एकत्रित सत्ता आहे. या बाजार समितीवर संजय जगताप गटाचे म्हणजेच काँग्रेसचे आठ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सहा तर शरद पवार गटाचे चार सदस्य आहेत. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये दोघांचेच अर्ज दाखल झाले होते. सभापती पदासाठी संदीप फडतरे तर उपसभापती पदासाठी बाळासाहेब शिंदे यांनी आपले अर्ज दाखल केले होते. ठरलेल्या मुदतीत इतर कोणाचाही अर्ज न आलेने ही निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली.. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी देखील अजित पवार आणि पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचा होल्ड राहिलेला आहे. आघाडीच्या माध्यमातून या बाजार समितीचे संचालक मंडळाची निवडणूक लढली गेली होती. यावेळी सुरुवातीचे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले होते. तर यानंतर ठरलेल्या मुदतीत राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचा सभापती करण्याचे ठरले होते. त्याचबरोबर बारामती तालुक्याला उपसभापती पद देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. या निर्णयाप्रमाणेच आजच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उपसभापती निवडून आला आहे. निवडीनंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचा सत्कार केला. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी देखील नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन केलं आहे. त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page