हमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (दि. 28) आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.
हार्दिक पंड्या सलग दुस-यांदा गुजरातला विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर एमएस धोनीचा सीएसके संघला पाचव्या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.
या शानदार सामन्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत, पण पाऊस चाहत्यांच्या आशांवर पाणी टाकू शकतो. अहमदाबादमधील हवामान बदलत आहे आणि रविवारी संध्याकाळी IPL फायनलच्या दिवशी पावसाची शक्यता जास्त आहे.
अशा परिस्थितीत जर आयपीएल 2023 चा अंतिम सामना पावसामुळे वाहून गेला तर कोणता संघ चॅम्पियन होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
पावसामुळे सामना वाहून गेला तर चॅम्पियन संघ कसा ठरवला जाईल?
आयपीएल 2023 चा अंतिम सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, अशा परिस्थितीत किमान 5-5 षटके घेण्यासाठी कट ऑफ वेळ 11.56 मिनिटे असेल.
दुसरीकडे, सामना 8 वाजता सुरू झाल्यास कट ऑफ वेळ 12:26 वाजेपर्यंत असेल. या वेळेपर्यंत पंच 5-5 षटकांची वाट पाहतील. कट ऑफ वेळेनंतर पाऊस सुरू राहिल्यास पंच सुपर ओव्हरचा निर्णय घेतील. पण जर सुपर ओव्हरच्या निर्णयानंतरही पाऊस राहिल्यास आणि खेळण्याची संधी मिळाली नाही तर मात्र चॅम्पियन संघ साखळी टप्प्यातील पॉइंट टेबलच्या आधारे निश्चित केला जाईल.
आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबल पाहिल्यास यात गुजरात टायटन्स 20 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत गुजरात टायटन्सला विजेता घोषित केले जाईल.