कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काल काँग्रेसने सरळ बहुमत मिळवत बाजी मारली. यावरून आता सर्व राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निकालानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दक्षिनेत भाजपची नाकाबंदी झाली अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी ट्विट केले की,’कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे’.
ते ट्विटमध्ये पुढे लिहितात,’राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!’ दरम्यान, या निकालानंतर अजित पवारयांनी दक्षिनेत भाजपची नाकाबंदी झाली अशी प्रतिक्रिया दिली आहे.