वडिलांकडे दारू पिण्याकरिता 500 रुपयांची मागणी केली असता नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात शिवीगाळ, दमदाटी करीत वडिलांवर विळ्याने वार केले.
याप्रकरणी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माणिकडोह येथे घडली. संजय चंद्रकांत ढोबळे (रा. माणिकडोह, जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
संजयचे वडील चंद्रकांत ढोबळे (वय 78) यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ढोबळे हे घरात एकटे असताना संजय याने तेथे येत त्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत 500 रुपयांची मागणी केली.
दारू पिण्यास पैसे देणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने संजयने विळा घेत त्यांच्यावर वार केले आणि तेथून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस अंमलदार संजय जाधव हे पुढील तपास करीत आहेत.