दारू पिताना झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एका मित्रावर कोयत्याने वार केले.

Photo of author

By Sandhya

दारू पिताना झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एका मित्रावर कोयत्याने वार केले.

दारू पिताना झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एका मित्रावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 22) रात्री धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.

आकाश संजय ठोंबरे (20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश कृष्णा गवारे (19, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि त्याच्या पाच अल्पवयीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक रवी भवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश आणि त्याचे पाच साथीदार धावडेवस्ती येथील एका हॉटेलसमोर दारू पीत बसले होते.

दारू पिताना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांचा फिर्यादी यांच्या मित्रासोबत वाद झाला. या वादातून आरोपींनी फिर्यादी यांच्या अल्पवयीन मित्रावर कोयत्याने डोक्यात, छातीवर वार केले.

तीन अल्पवयीन मुलांनी फिर्यादी यांच्या जखमी मित्राला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एकाने बिअरची बाटली फोडून पाठीत भोसकली. तसेच, एकाने टोकदार चमचाने फिर्यादी यांच्या मित्रावर आणखी वार केले. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page