दौंड : कुसेगाव येथे सोमवार दिनांक १६व१७डिसेबर रोजी श्री भानोबा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली या यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली या मघ्ये वाहतुकीची मोठी कोंडी झाली सुमारे तीन तास वाहतुकीची कोंडी झाली यामुळे पोलीस प्रशासनाला सुरळीत करायला कसरत करावी लागली, कुसेगाव ते रोटी दोपदरी रस्ता, भक्ती निवास, पाण्याची सोय, सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या कडेने पद दिवे, स्वच्छालय, होण्याबाबद यात्रा नागरिकातुन मागणी होत आहे यात्रेत देव दानवाचे युद्ध झाले दोन दिवसांमध्ये बाराशे ते चौदाशे पर्यंत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गड्यांना उठवण्यासाठी तरुण वर्ग कमी पडत होता पुढील काळामध्ये दौंड तालुक्यातील अनेक गावातील तरुण मंडळाला निमंत्रण देणे गरजेचेआहे अशी नागरिकांनी मनोगत व्यक्त केले