दौंड: कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

दौंड तालुका कडेठाण येथे शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता वाघजाई वस्ती धावडे मळा येथे लताबाई बबन धावडे वय 51 ह्या महिलेस बिबट्याने हल्ला करून जीव मारले सदर ही महिला शेतामध्ये कांद्याचे रोप निंदत असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने लताबाई धावडे या महिलेस बिबट्याने उसामध्ये ओढून नेले ही घटना संध्याकाळी चार वाजता घडली असून रोप नींदत असणाऱ्या लताबाई अचानक दिसणा असे झाल्याने तेथील नागरिकांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता मयत लताबाई बबन धावडे या उसामध्ये नागरिकांना रक्ताच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाल्या सदर या घटनेची यवत पोलीस स्टेशन फोन वरती तक्रार दिली यासंदर्भात पाटस पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक सलीम सय्यद व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले परिस्थिती पाहता नागरिकातून बिबट्याच्या हल्ल्यातून लताबाईचा मृत्यू झाल्याचा संताप होत होता.

बिबट्या ह्या प्राण्यापासून हल्ला झाला की नाही यासाठी दौंड वनपरिषद अधिकारी राहुल काळे व त्यांचे सहकार्यांनी बिबट्याच्या हल्ल्याने लताबाई बबन धावडे या मृत्यमुखी पडले असल्याचे वनाधिकारी यांनी कबुली दिली.

Leave a Comment