दीपक केसरकर : मुंबईबदलापूर येथे बुधवारी पीडितांच्या पालकांची भेट घेणार…

Photo of author

By Sandhya

दीपक केसरकर

बदलापूर येथील झालेली घटना अत्यंत दुर्देवी घटना असून ही घटना ज्या शाळेत घडली आहे. त्या शाळेची, शाळेची कमिटी, शाळेचे प्राचार्य यांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक व मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष करीत असून त्याचा प्राथमिक अहवाल घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल प्रसारमाध्यमांशी दिली.

ते पुढे म्हणाले की, दि. 13 ऑगस्टच्या आसपास ही घटना घडली असून या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

शिक्षणमंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे की, विद्यार्थी हेच माझे अंतिम ध्येय असून कोणत्याही विद्यार्थ्यास काही झाले, तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मग ते शाळेचे प्राचार्य असो किंवा संचालक सर्वांना परिणाम भोगावे लागतील.

उद्या (दि. २१) याच ठिकाणी संध्याकाळी 4.00 वाजता पालकांना भेटायला येणार आहे. त्यावेळी पालकांनी आपले जे काही म्हणणे आहे ते मला सांगावे.

त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. शाळेच्या विरोधात सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

कायदा ठरवेल कोणती शिक्षा द्यायची. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविली जाणार आहे. यासाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाणार आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून डॉक्टर, पोलीस यांच्याकडून दिरंगाई झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल. पीडितांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यांना न्याय दिला जाईल, असे केसरकर यांनी आश्वस्त केले.

Leave a Comment