विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर…

Photo of author

By Sandhya

विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे.

पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील मतदारसंघांमध्ये रावेर, सिंदखेड राजा,  वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोणाला मिळाली संधी? १. रावेर – शमिभा पाटील२. सिंदखेड राजा – सविता मुंढे३. वाशिम- मेघा किरण डोंगरे४. धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा५. नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे६. साकोली – डॉ. अविनाश नन्हे७. नांदेड दक्षिण- फारुक अहमद८. लोहा – शिवा नरंगले९.

छत्रपती संभाजीनगर पूर्व – विकास दांडगे१०. शेवगाव – किसन चव्हाण११. खानापूर – संग्राम माने दरम्यान, “आमच्यावर काहीही आरोप होत असले तरी आम्ही राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे,” असं या पत्रकार परिषदे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

Leave a Comment

You cannot copy content of this page