उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक शिरूर तालुक्यातील कान्हूर गावच्या यमाई देवीला भेट देऊन दर्शन घेतले . त्यांचा हा अचानक दौरा पाहून नागरीकांनी मोठी गर्दी केली . पाबळ येथील हेलीपॅडवर त्यांचे हेलीकॉप्टर उतरताच तेथेही ग्रामस्थांची गर्दी उसळली होती . यावेळी ग्रामस्थांनी त्यांची भव्य मिरवणूक काढून कान्हूर ग्रामपंचायतीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला . त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगीतले की “हा खाजगी दौरा असून जुन्या मित्रांसोबत मी नेहमी येत असतो . ” तसेच या भागातील शेतीच्या पाण्याबाबत नागरीकांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी ” आपण याबाबत लक्ष घालणार असल्याचे सांगीतले . ” या दौऱ्याबाबत प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले . मोठा पोलीस बंदोबस्त व इतर संबंधीत यंत्रणांनी चोखपणे जबाबदारी पार पाडली .