Deputy Chief Minister Sunetra Pawar hands over a cheque of Rs 5 lakh to Pinki Mali’s heirs

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते दिवंगत फ़्लाईट अटेंडंट पिंकी शिवकुमार माळी यांच्या वारसाला आर्थिक मदत म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सचिन यादव उपस्थित होते.
बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अपघातामध्ये
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत दिवंगत पिंकी शिवकुमार माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज दिवंगत माळी यांचे पती सोमविकास सैनी यांच्याकडे आज धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे.