धनंजय मुंडे : “मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार बार गिरे, मगर ये…’

Photo of author

By Sandhya

धनंजय मुंडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा उमेदवार देत पंकजा मुंडे यांचा पराभव घडवून आणला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धनंजय मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या परळी मध्ये शरद पवार मोठी खेळी खेळणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

नुकतंच धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारांना निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळालं. ‘मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार बार गिरे. मगर ये मुमकिन नही है. मला इथेच बांधून ठेवणं, मला टार्गेट करणे हे आजचं नाही. अनेक जणांनी हा प्रयत्न केला आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं ज्या नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो.

त्या नेत्यांना ही पातळी गाठली आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. मुंडे पुढे म्हणाले, ‘ज्याअर्थी माझे घर, माझी जात यावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीका करावी लागते.

तसं पाहिलं तर परळी वैजनाथ मतदारसंघातील मायबाप जनता अतिशय हुशार आहे, सुज्ञ आहे. त्यांना माहीत असतं की, आपल्या माणसाला का टार्गेट केलं जात आहे. याप्रमाणेच त्यांचा टार्गेट कसा हाणून पाडायचा हे सुद्धा परळीकरांना फार चांगलं माहित आहे,’ असं देखील ते यावेळी म्हणाले.

धनंजय मुंडेंनी परळीतील एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. धनंजय मुंडे शरद पवारांवर टीका केली. दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी निवडणूक झाली होती. मात्र, यात धनंजय मुंडे यांचा विजय झाला होता तर पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

मात्र आता दोन्ही नेते एकाच युतीमध्ये असल्याने ते एकमेकांच्या विरोधात उभे राहणार नाही. त्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंकजा मुंडे यांना थेट विधानपरिषदेवर पाठवण्यात आले आहे.

त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment