छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद यादरम्यान धावत्या लोकलमध्ये वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास २० वर्षीय तरुणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये बसली होती. यावेळी ती द्वितीय श्रेणीच्या डब्यात एकटीच होती. यावेळी एक चाळीस वर्षीय इसम डब्यात चढला.
त्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद यादरम्यान तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो मशीद या स्टेशनवर उतरला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर सदर इसम लोकल मधून उतरल्याचे समजते.
पीडित तरुणी परीक्षा देण्यासाठी जात होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर पोलिसांनी आठ तासांनी आरोपीला अटक केली आहे त्याची कसून चौकशी केली जाते तो कामगार असल्याचे माहिती मिळाली आहे.