बाधितांना ३ कोटी रुपयाहून अधिक रक्कम धनादेशाद्वारे अदा- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
Direct purchase process of land acquisition through negotiation for Degree Veterinary and Animal Science College completed

उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत मौजे कऱ्हावागज येथील २२.३० हेक्टर आर क्षेत्र नवीन पदवी पशु वैदयकीय व पशु विज्ञान महाविद्यालय स्थापनेकरिता खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने भुसंपादनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
मौजे कऱ्हावागज येथील संपादन होणाऱ्या गट नंबर ७४ पैकी ०.६४३० हेक्टर आर.चौरस मीटर, गट क्रमांक ७२ पैकी १.९४९० हेक्टर आर. चौरस मीटर क्षेत्राचे खरेदी खत करण्यात आले. या गटाचे खातेदार रघुनाथ नाळे, नंदिनी बाळासो गाढवे व इतरांना नुकसान भरपाईचा मोबादला एकूण ३ कोटी ३४ लाख ३३ हजार ५ रुपयाचा धनादेश उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या हस्ते व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ नागपूर तर्फे डॉ. विकास वासकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.