स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात निधनाची चौकशी व्हावी यासाठी डोर्लेवाडी ग्रामस्थांच्यावतीने कडकडीत बंद

Photo of author

By Sandhya

Dorlewadi villagers call for strict shutdown to demand inquiry into the death of late Deputy Chief Minister Ajit Pawar in a plane crash

बारामती- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गेल्या महिन्यात विमान अपघातात मृत्यू झाला आहे.सदर विमान अपघात हा नैसर्गिकरीत्या झाला नसून घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे केंद्र व राज्य शासनाकडून या संशयित विमान अपघाताचा तपास वेळेवर केला जात नसल्याची तक्रार केली जात आहे. मात्र त्याची दखल घेत नसल्याने संपूर्ण महाराष्ट्र सह बारामती तालुक्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले असून या प्रकरणाची निपक्षपातीपणे व जलद गतीने चौकशी व्हावी, यासाठी आज डोलेवाडी येथे निषेध सभा व बंद पुकारण्यात आला.त्यास ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे सहभाग दाखवला. डोर्लेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेत गावातील अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व तपास योग्य रीतीने व्हावा यासाठी शासनास निवेदन तयार करण्यात आले होते.त्या निवेदनाची प्रत बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.जर योग्य पद्धतीने तपास झाला नाही तर मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्णय यावेळी समस्त ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page