…यामुळे सर्दी, खोकला व ताप यांचे रुग्ण वाढले

Photo of author

By Sandhya

यामुळे सर्दी, खोकला व ताप यांचे रुग्ण वाढले

हवामानात बदल झाला म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आजारी पडत आहेत. पावसाळा असूनही कधी ऊन तर कधी पाऊस, हवेतील दमटपणा यामुळे सर्दी, खोकला व ताप यांचे रुग्ण वाढले आहेत.

यातून पूर्णपणे बरे होण्यास सात ते दहा दिवसांचा कालावधी रुग्णांना लागत आहे, त्यानंतर भरपूर अशक्तपणा जाणवणे ही सार्वत्रिक तक्रार रुग्णांकडून ऐकायला मिळत आहे. आजारपणाची आर्थिक झळ रुग्णांना बसत आहे. आठवडाभराच्या औषधांसाठी ५०० ते ५५० रुपये लागतात, अशी माहिती मेडीकल विक्रेत्यांनी दिली.

ही आहेत लक्षणे… नाकात, घशात, श्वासनलिकेत कफ जमा होत आहे. ब्राँकायटिसची लक्षणे दिसून येत आहेत. जीव घाबरतो. खोकल्याची उबळ येते. कफ पांढरा, पिवळा असतो. ताप येतो. उष्ण, रूक्ष, दमट हवामान असल्याने रुग्णांना अशक्तपणा अधिक जाणवत आहे. दमट वातावरणात दमा, अॅलर्जीचा त्रास रुग्णांना अधिक होत आहे.

हे करावेत उपाय आरओचे पाणी पित असला, वारंवार हात धुवत असला तरी शरीरांतर्गत प्रतिकारशक्ती कमी नको. त्याकडे लक्ष द्यायला हवे. शीतपेय पिण्यात आल्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास झालेले रुग्ण आहेत. रात्री जागरण करणे टाळावे, फास्ट फूड खाऊ नका, नियमित व्यायाम करा, आरोग्यदायी जीवनशैली जगा, तणावांपासून दूर रहा, असे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page