भाजपप्रणित एनडीएची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार सहभागी झालेत. बैठकीला संबोधित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
प्रस्तावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन दिले. यावेळी बोलताना त्यांनी एनडीए-शिवसेनेतील युती ‘फेविकॉल का जोड’ असल्याचे म्हटले. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना लोकांनी नाकारलं आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे.
कारण आज नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात येत आहे. आम्ही या प्रस्तावाला अनुमोदन देत आहोत. गेल्या दहा वर्षात मोदी यांनी या देशाचा विकास केला. या देशाला पुढे नेले. या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली.
या देशाला नवी ओळख देण्याचे काम केले. खोटा अजेंडा राबवला, लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. पण खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना लोकांनी नकारलं आहे. लोकांनी मोदी यांना स्वीकारलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
भाजप-शिवसेनेतील युती ‘फेविकॉल का जोड’ Eknath Shinde । भाजप-शिवसेनेतील युती ‘फेविकॉल का जोड’ एनडीए आणि शिवसेना या दोन पक्षांतील युती हा ‘फेविकॉल का जोड’ आहे. तो कधीही तुटणार नाही. लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी मेहनत केली.
त्यांनी सभा घेतल्या. त्यांची जादू पुन्हा एकदा दिसऱ्यांदा दिसली. त्यामुळेच मी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. फक्त राजकारण करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं आहे, असंही शिंदे म्हणाले.