अजित पवारांचा गट भाजपबरोबर आल्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांना सरकारकडून दुय्यम वागणूक दिली जात असून एकनाथ शिंदे यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे अशी आपली माहिती आहे असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे अशी आपली माहिती असून सरकारमध्ये पुन्हा मोठे बदल होतील असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अजित पवार सरकारमध्ये आल्यापासून एकनाथ शिंदे गटात मोठी अस्वस्थता असून त्यांच्यातील सतरा ते अठरा आमदारांनी आमच्याशी पुन्हा संपर्क साधला आहे, अशी माहिती ठाकरे गटाचेच दुसरे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची योजना आहे असे विधान केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वता शिंदे यांनी काल या बातम्यांचे खंडन केले असून त्यांनी म्हटले आहे की आम्ही राजीनामा देणार नाही. सरकारची मुदत संपेपर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.