एकतर्फी प्रेमातून तरूणीचा विनयभंग

Photo of author

By Sandhya

एकतर्फी प्रेमातून तरूणीचा विनयभंग

शिर्डीवरून आलेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून ओळखीतील 19 वर्षीय तरुणीशी नोकरी करत असलेल्या शहरातील ‘टॉप टेन’ या इमारतीत येऊन त्याने तिच्याशी झटापट करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आणि तिला धमकीबाजी करत इमारतीवरून फेकून देण्याची धमकी दिली.

संगमनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिर्डी येथील राहणारा आकाश पवार या तरुणाची तीन वर्षापासून या तरुणीशी ओळख होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याची ओळख असणार्‍या तरुणीशी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याने तिला त्याने फोन केला.

‘तू खाली येते की, मी वर येऊ, असे दरडून म्हणत खाली बोलवले. तेथे येत ती आली असता तो म्हणाला की, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून त्याने तिचे केस धरून अंगातील टी-शर्ट धरून ओढला. हा सर्व प्रकार ‘टॉप टेन’ इमारतीत असणार्‍या सुरक्षारक्षकांनी पाहिला त्याने त्याला हटकले असता त्या तरुणांनी त्यालाही शिवीगाळ करून दमदाटी केली’ त्यानंतर ती पुन्हा दुकानाकडे निघून गेली.

तो वरती गेला आणि त्या दुकानातील कर्म चार्‍यांना सुद्धा त्याने दमदाटी केली आणि तो तिला म्हणाला की, ‘तुला मी वरून खाली फेकून देतो’ अशा प्रकारची धमकी देऊन तो निघून गेला.

Leave a Comment

You cannot copy content of this page