Expenditure inspectors conduct review in connection with Baramati Assembly by-elections

Photo of author

By Sandhya

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने खर्च निरीक्षकांनी घेतला आढावा
भारत निवडणूक आयोगाकडून बारामती विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघासाठी बनोत अखिल रामनाईक यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रामनाईक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने उप विभागीय अधिकारी कार्यालय, बारामती येथे आढावा बैठक घेतली आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथक, व्हिडिओ पाहणी पथक, फिरते सर्वेक्षण पथक तसेच स्थिर सर्वेक्षण पथकांना मार्गदर्शन केले.
श्री. रामनाईक यांनी खर्च पथकाच्या संपूर्ण कामकाजाचा सखोल आढावा घेतला असून, कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या.निवडणुकीचे कामकाज काटेकोरपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना श्री. रामनाईक यांनी दिल्या.
निवडणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ०२११२-२२४३८६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीपूर्वी बनोत अखिल रामनाईक यांनी उंडवडी सुपे येथील स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट देऊन त्यांच्या कामाचा आढावा घेतला.
या बैठकीला किशोर माने गटविकास अधिकारी, विविध पथकातील अधिकारी, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page