![](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-06-at-11.16.34_285d5ed7.jpg)
बीडच्या मस्साजोगचे आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरणारे भाजपाचे आष्टीचे आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहे. आज त्यांच्याच आष्टीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. “फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ आहेत. देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांची कणखर भूमिका सर्वांनाच आवडली”, असं म्हणत सुरेश धसांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. तसेच सुरेश धसांनी यावेळी फडणवीसांचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेखही केला. यावेळी त्यांनी दिवार सिनेमातील तो किस्सा सांगितला ते म्हणाले, कॉलेजमध्ये असताना मी दिवार सिनेमा पाहिला होता. अमिताभ शशि कपूरला म्हणतो, मेरेपास गाडी है, बंगला है, नोकर है, चाकर है तेरे पास क्या है… त्यावेळी शशि कपूर म्हणतो, मेरे पास मां है. तसं आईचे आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय. तुमच्यासारखा नशिबवान कोणी नाही. माझी आई गेली. वडील गेले. माझी दुसरी आई जिवंत आहे. माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहात मी विचारलं माझ्या आईचं नाव घेऊ का. मी माझ्या दुसऱ्या आईचंही नाव घेतलं. साहेब, तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं मला काही तरी मिळेल.
मला मंत्रिपद नाही दिलं तरी, मी म्हणतो मला मंत्रिपद नको, पालकमंत्रीपद नको. काही देऊ नका. हे चार टीएमसी, तिकडचे साडे तीन टीएमसी पाणी द्या, असं म्हणत त्यांनी फडणवीसांकडे मागणी केली. पुढे ते असेही म्हणाले, मला हिणवतात. काय आहे याचं मुख्यमंत्र्यापाशी. मला विचारता तेरे पास क्या है. मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असाच ठेवा.