पुणे | चंदननगरमध्ये अल्पवयीन मुलाच्या हत्येचा आरोपी पिता अटक

Photo of author

By Sandhya


पुणे :
चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका भीषण गुन्ह्यात ३ वर्ष ४ महिन्यांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येचा आरोपी त्याचा पिता असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी माधव साधुराव टिकेटी (३८) याला पोलिसांनी अटक केली असून त्यानेच आपल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
दि. २० मार्च २०२५ रोजी सकाळी १२:३० ते २१ मार्च २०२५ रोजी रात्री ००:३० या कालावधीत चंदननगरमधील तुकारामनगर येथील रतन प्रेस्टीज बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या स्वरूपा माघव टिकेटी (३०) यांनी त्यांच्या ३ वर्ष ४ महिन्यांच्या मुलाच्या गहाणामुळे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा हिम्मत माधव टिकेटी याला त्याचे पती माधव टिकेटी यांच्या कायदेशीर रखवालीत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फसवून नेले होते. या तक्रारीवरून चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना आरोपी माधव टिकेटीवर संशय आला. त्याच्या मोबाईलच्या सीडीआर आणि सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये माधवने आपल्या मुलाला घेऊन जाताना दिसत होते, परंतु परत येताना मुलगा त्याच्या जवळ नव्हता. तसेच, माधवने वाटेत एका दुकानातून चाकू आणि ब्लेड विकत घेतल्याचेही आढळून आले.

तपासादरम्यान माधवने पोलिसांसमोर कबुली दिली की त्याने आपल्या मुलाला एका निर्जन ठिकाणी नेऊन चाकूने त्याचा गळा चिरून हत्या केली. त्याच्या या कृत्यामुळे त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या कलमात बीएनएस कलम १०३ (१) आणि २३८ जोडण्यात आले आहे.
या प्रकरणातील तपास पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त श्री. रंजन कुमार, अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त श्री. हिम्मत जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात आला. चंदननगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक श्री. अजय असवले, श्री. राहुल कोळपे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या प्रकरणातील तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांनी आरोपी माधव टिकेटीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू ठेवली आहे

Leave a Comment