जेजुरीत दुकानाची तोडफोड करणारे पाच आरोपी जेरबंदजेजुरी पोलिसांची कारवाई

Photo of author

By Sandhya

Five accused arrested for vandalizing a shop in Jejuri, action taken by Jejuri police

दोन महिन्यांपूर्वी घडली होती घटना

जेजुरी वार्ताहर

दिनांक 24 महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीतील नंदी चौकात भंडार खोबरे विक्रेत्याला मारहाण करून दुकानाची तोडफोड करणाऱ्या पाच आरोपींना जेजुरी पोलिसांनी अटक केली.
स्वप्नील जयेंद्र कांबळे वय 33 रां बुद्ध विहार दिघी पुणे, प्रणय राजू पाटोळे वय 26 ,यश राजू पाटोळे, वय 19 दोघे राहणार काळेवाडी पुणे, सुधीर बाळू पाटोळे वय 34 व सूरज बाळू पाटोळे वय वय 25 दोघे रा मरकळ पुणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत
या प्रकरणाबाबत माहिती अशी की, जेजुरी येथील गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नंदी चौकात महादेव वाघमारे यांचे भंडार खोबरे व पेढे विक्रीचे दुकान आहे. दिनांक 31 जानेवारी रोजी काही भाविक या दुकानासमोर येवून त्यांनी तिथे आपल्या पायातील चपला ठेवण्याचा आग्रह धरला.यावेळी दुकानदार वाघमारे यांनी आमच्या दुकानासमोर चपला ठेवून नका, ज्या ठिकाणी तुम्ही भंडार खोबरे घेतले आहे त्या ठिकाणी चपला ठेवा असे सांगितले. या कारणावरून दुकानदार व भाविक यांच्यात वाद होवून वरील आरोपींनी जमाव जमवून वाघमारे यांना दांडक्याने हातापायाने मारहाण करून दुकानातील भंडार खोबरे, पेढे फेकून देवून दुकानाची मोडतोड करून आरोपी पळून गेले होते.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडिया तसेच टिव्ही चॅनल वर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी फिर्यादी वाघमारे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तींवर तक्रार दाखल केली होती.
या मारहाण व तोडफोडीची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पोलिसांनी या व्हिडिओचा आधार घेत दोन आरोपींचे फोटो वॉट्सप ग्रुप वर प्रसारित केले. गोपनीय बातमीदारा कडून माहिती घेत जेजुरी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार नंदकुमार पिंगळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page