
वाघोली : हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे शाखा युनिट-६ यांनी संयुक्तपणे भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त अन्नपदार्थाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय आणून देणारी घटना मांजरी खुर्द येथे घडली आहे. मांजरी खुर्द येथील एका शेतातील गोदामावर अन्न औषध प्रशासन व युनिट ६ ने छापा टाकला. या छाप्यात ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा भेसळयुक्त पनीर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोपान साळवे हे त्यांच्या गोदामामध्ये केमिकलचा वापर करून दूध विरहित कृत्रिम पनीर बनवत होते. या पनीरमध्ये आरोग्यास घातक असणारे घटक आढळून आले. हे पनीर खाणे म्हणजे लहान मुलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणे होते.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी अन्न व औषध प्रशासनाला याविषयी माहिती दिली. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करत गोदामावर छापा टाकला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल पंचनामा करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहे शहरात व जिल्ह्यात कृत्रिम दूध, दही, पनीर आणि तूप बनविनाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. अशा टोळ्यांविषयी नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या आरोपी सोपान साळवे (वय ४५ वर्ष) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट
जप्त मुद्देमाल-
१४००,किलो भेसळयुक्त पनीर
४००,किलो जीएमएस पावडर
१८००,किलो एसएमपी पावडर.
७१८,लिटर पामतेल
एकूण किंमत: ११ लाख ५६ हजार ६९० रुप