गळ्याला कोयता लाऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

Photo of author

By Sandhya

गळ्याला कोयता लाऊन अल्पवयीन मुलीवर  वारंवार बलात्कार

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे कोयत्याचा धाक दाखवून आई – वडिलांना जीवे मरण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधम भावांनी मागिल पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात बुधवारी (ता. १२) संध्याकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आहे. मुलीच्या आईने मुलीकडे विचापुस केली असता वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी इरफान शेख (मुजावर) व आयुब शेख (मुजावर), (रा. दोघेही, दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली) या नराधमांविरूद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तसेच दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, यांनी दिली आहे.व तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे हि त्यांनी सांगितले.

तसेच लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आई हि उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात कुटुंबासहित राहतात. मंगळवारी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी मुलीची आई या बाहेर आल्या होत्या. यावेळी मुलगी अभ्यास करीत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब मुजावर हा दिसून आला.

यावेळी पिडीतेच्या आईला आयुब मुजावर याने पहिले असता पळून गेला. मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिले असता यावेळी खोलीत इरफान मुजावर हा खोलीत दिसून आला. मुलीच्या आईला पाहून तो तेथून पळून गेला.

मुलीच्या आईने मुलीकडे अधिक चौकशी केली असता तिने सांगितले कि, आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागिल पंधरा दिवसांपासून तिच्यावर दोघेजण कोयता लाऊन बलात्कार करत होते.

मात्र दोघांकडून आई वडिलांच्या जिवाला भिती असल्याने, मागिल पंधरा दिवसांपासून दोघांचे अत्याचार निपुटपणे पिडीत मुलगी झेलत होती. मंगळवारी संध्याकाळी तिच्याशी आळीपाळीने बळजबरीने शरीर संबंध करण्यासाठी आले असल्याची माहिती पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितले.

यावरून पिडीत मुलीच्या आईने इरफान शेख व आयुब शेख याचे विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कायदेशिर तक्रार दिली आहे.तसेच घटनेचा निषेध करत उरुळी कांचन ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने काढला मुक मोर्चा.

तसेच घडलेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून शनिवारी (ता. १५) अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गाव बंद ठेवण्याचा निर्णय उरुळी कांचन येथील स्थानिक युवकांनी घेतला होता. त्याला गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनीपाठिंबा देत संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे.

उरुळी कांचन येथील शाळा सुटल्यावर परिसरात रोडरोमिओ शाळकरी मुलींच वाट पाहतात. रोज घडत असलेला प्रकार, उरुळी कांचन परिसरातील एम जी रोड, दत्तवाडी रोड ,तुपे वस्ती रोड, बाजार चौक, स्मशानभूमी परिसरात,बगाडे वस्ती रोड,अशा ठिकाणी रोडरोमिओ शाळकरी मुलींची वाट पाहत असतात

व मुली आले की त्यांच्या पाठीमागे गाड्या घेऊन गाड्यांचा आवाज काढत पाठलाग करत मुलींच्या घरांच्या घरापर्यंत नाहक त्रास देतात. या रोड रोडरोमिओ पासून मुलींची सुटका होणार कधी ? उरुळी कांचन परिसरात मुली असुरक्षित

Leave a Comment