गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर तिहार तुरुंगात हल्ला करून हत्या

Photo of author

By Sandhya

गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर तिहार तुरुंगात हल्ला करून हत्या

दिल्लीतील रोहिणी कोर्ट गोळीबारातील आरोपी गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर तिहार तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळी सदस्य योगेश टुंडा आणि इतरांनी हल्ला करून हत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार, कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत टिल्लू यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला.

तिहार तुरुंग क्रमांक आठ-नऊमध्ये बंद असलेला कुख्यात गुंड सुनील उर्फ ​​टिल्लू ताजपुरिया याची मंगळवारी हत्या करण्यात आली. छोट्या हत्याराच्या सहाय्याने टिल्लूवर वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गोगी टोळीशी संबंधित असलेल्या योगेश टुंडावर टिल्लू ताजपुरिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. रोहिणी न्यायालयाच्या आवारात यापूर्वी गोगीची हत्या झाली होती. तेव्हा टिल्लू यांच्यावर हा आरोप करण्यात आला होता.

टिल्लू आणि गोगी टोळी दिल्लीच्या बाहेरील भागात सक्रिय होती. भांडणातून दोन्ही टोळ्यांच्या म्होरक्याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तिहारमध्ये एका महिन्यात टोळीयुद्धाची ही दुसरी घटना आहे. याआधी राजकुमार तेवतिया यांची हत्या झाली होती.

Leave a Comment