
Pune GBS Outbreak : पुण्यात जीबीएसने थैमान घातले आहे. कारण पुण्यात जीबीएस बाधित रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. सुरुवातीला हा आजार दुषित पाण्यामुळे होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपासणीनंतर पाण्यामुळे हा संसर्ग होत नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोबड्यांच मांस खाल्ल्याने जीबीएसचा आजार होत असल्याचा दावा केला होता. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर अन्न व औषध विभागाने (FDA)ने सिंहगड रोडवरील कोबड्यांच्या मासांची तपासणी केली. या तपासणीत कोंबड्याच्या मांसामध्येही बॅक्टेरीया आढळला नाही आहे. त्यामुळे आता कोंबड्यांच्या मांसामुळे देखील जीबीएस होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
खरं तर गेल्या रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात GBS हा आजार पाण्यामुळे नाही, तर कोंबड्याचं मांस खाल्याने होत असल्यादा दावा केला होता. त्यामुळे कोंबड्यांचे मांस घेतल्यानंतर ते पूर्णपणे शिजवूनच खा, असा सल्ला त्यांनी पुणेकरांना दिला होता. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले होते.
सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने सिंहगड रोड परिसरातून 60 कच्च्या कोंबडीचे नमुने गोळा केले होते. त्यानंतर ते ठाण्यातील एनएबीएल-मान्यताप्राप्त सुविधा असलेल्या एन्व्हायरोकेअर लॅब्सकडे पाठवले होते. यावेळी केलेल्या चाचणीमध्ये चिकनच्या मांसामध्ये बॅक्टेरियाचे दूषित घटक, विशेषतः सी. जेजुनी नसल्याचे पुष्टी झाली आहे. एफडीएने हा निष्कर्ष पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) यांना कळवला आहे.
दरम्यान अजित पवार यांनी यापूर्वी लोकांना कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन केले होते. कारण त्यांच्याशी GBSच्या वाढत्या प्रकरणांचा संबंध आहे अशी चिंता होती.त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की पाणीपुरवठ्यातील दूषितता हा प्राथमिक संशय आहे.तसेच जीबीएसची परिस्थिती नियंत्रणात आहे. पूर्णपणे शिजवल्यानंतरच चिकन खावे, कारण कमी शिजवलेले मांस मानवांमध्ये संसर्ग निर्माण करू शकते,असेही अजित पवार म्हणाले होते.
आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?
जेजुनीने दूषित पाणी किंवा अन्न सेवन केल्याने बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो आणि क्वचित प्रसंगी जीबीएस, एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होऊ शकतो.पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) सध्या उपचार घेत असलेल्या जीबीएसच्या संशयित ३० रुग्णांच्या मलमूत्राच्या नमुन्यांमध्ये सी. जेजुनीचे अंश आढळले. मांस अयोग्यरित्या शिजवल्याने बॅक्टेरिया तसेच राहू शकतात आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.