गिरीश महाजन : एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू…

Photo of author

By Sandhya

गिरीश महाजन

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय वर्तुळात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक बडे नेते भाजपमध्ये किंवा सहकारी पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. यातच काल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्यानंतर आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची देखील घरवापसीची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी यावर भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू असल्याचे गिरीश महाजन यांना विचारण्यात आले. त्यावर महाजन म्हणाले की, “एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असे मला कळाले आहे.

दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. पण अद्याप पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत विचारणा झालेली नाही. मला वाटते तसे काही प्रयोजन नाही.

मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी.”

दरम्यान, एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. तसेच ते  आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडताना दिसत नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा अजित पवार गटाला दिल्यानंतर खडसे फार सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले नाही.  त्यातच आता एकनाथ खडसे यांच्या  घरवापसीबाबत होणाऱ्या चर्चांवर गिरीश महाजन यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. 

Leave a Comment