गिरीश महाजन यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या महाविजय 2024 या दौऱ्यात भुसावळ येथे रावेर लोकसभेसाठी भाजपाच्या वॉरियर्स सोबत संवाद साधला.
यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी जयंत पाटील, एकनाथ खडसे आणि संजय राऊतांवर टीका केली. जयंत पाटील यांच्यावर बोलताना महाजन म्हणाले की, “ते त्यांचा पक्ष सांभाळावे. त्यांना आठ ते दहा आमदार आणि दोन-तीन खासदार राहिले आहेत.
तेवढे ते सांभाळावे. लोकांचा आमच्यावर आणि आमच्या पक्षावर विश्वास आहे. आमचे सरकार काम करते आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
एकनाथ खडसे यांच्यावर बोलताना महाजन म्हणाले की, “खडसेंचे डोके फिरले आहेत. डोक्यावर परिणाम झालेला आहे. आता ते स्वतः अडचणीत आहेत. त्यांना दुसरे काहीही सुचत नाही. कमरेखालच्या भाषेत बोलत नाही. न बोललेलेच बरे. आता कागदोपत्री जे होईल त्याला त्यांनी सामोरे जावे.”
संजय राऊतांवर बोलताना महाजन म्हणाले की, “राऊत यांना उपचार करण्याची गरज आहे. ते सध्या काहीही बोलतात. आमच्याकडे 210 च्या वर आमदार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे बोटावर मोजणे इतके आमदार आहेत.
तर राष्ट्रवादीकडे आठ ते दहा आमदार आहेत. त्यांच्याकडे राहिले तरी काय तरी पण ते इतकी हिंमत व धाडस या ठिकाणी करतात. राऊत हे वाचाळवीर आहेत. ते प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी काही बोलतात.” महाजन यांनी पुढे सांगितले की, “आम्हाला महाविजय संकल्प या दौऱ्यातून 325 जागा जिंकायचे आहेत.
राज्यात 45 प्लस म्हणजे शंभर टक्के निकाल लावायचा आहे. पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना विराजमान करायचे आहे. देशाला सुपरपॉवर बनवायचे आहे. देशाला महासत्ता बनवायचे आहे.”
महाजन यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळेस साडेतीन लाखाचा लीड घेतला होता. यावेळेस चार लाखाचा लीड घ्यायचा आहे. तर जळगाव लोकसभेत चार लाखाचा लीड मिळवला होता. यावेळेस तो साडेचार ते पाच लाखाचा लीड घेऊन दोन्ही लोकसभा जागांवर विजय मिळवायचा आहे, असा निर्धार व्यक्त केला.