पुण्याच्या दौ-यावर आलेल्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आमदार संजय जगताप यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी विशेषाधिकार आणि अवमानाबाबत कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.
पुरंदर तालुक्यातील नागरीकांच्या प्रश्नांबाबत सासवड येथे पुर्व नियोजन करून आयोजित केलेल्या आमसभेच्याच दिवशीच मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात पुरंदरच्या प्रश्नांबाबत बैठक आयोजित केली.
त्याबाबत आमदार संजय जगताप यांना माहीती मिळाल्यावर त्यांनी पत्र पाठवून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या स्विय सहाय्यकांशी भ्रमणध्वनीव्दारे चर्चा करून याच दिवशी पुरंदर तालुक्यात आमसभा असून मुंबई येथील सदर बैठक रद्द करून पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
असे असतानाही लोकप्रतिनिधी शिवाय मा मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांची बैठक घेतली. आमसभा असताना त्या मतदारसंघाबाबत इतर कोणत्याही शासकीय बैठकीचे आयोजन करू नये या परंपरेचा जाणीखेडवपुर्वक उल्लंघन केला.
ही बाब संसदीय लोकशाहीला घातक असून जनतेतून निवडूण आलेल्या विधानसभा सदस्यांचा व विधानसभेच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान करणारी असल्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना सांगत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकारभंग व अवमानानाची तक्रार समक्ष भेटून पत्र देऊन केली होती.
मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या लोकप्रतिनिधी विशेषाधिकार आणि अवमानाबाबतची याचिका फेटाळली असल्याने याविरोधात आमदार संजय जगताप यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत कारवाई संदर्भात निवेदन दिले आहे.