
मुंबई : अभिनेता गोविंदा आणि सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच गोविंदावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोविंदाच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.गोविंदा दु:खात असून त्याला अश्रू अनावर झालेत.
अभिनेता गोविंदाचा दीर्घकाळचा सेक्रेटरी शशी प्रभू यांचे 6 मार्च 2025 रोजी निधन झाले. या बातमीने गोविंदा यांना मोठा धक्का बसला आहे. शशी प्रभू यांच्याशी त्यांचे जवळचे नाते होते. ही दुःखद बातमी कळताच गोविंदा लगेच त्यांच्या घरी पोहोचला.
शेवटचा निरोप देताना अश्रू अनावर
संध्याकाळी अंत्यसंस्कारादरम्यान, गोविंदाला त्यांच्या प्रिय मित्राला अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले. शशी प्रभू यांच्या निधनाची बातमी त्यांना दुपारी मिळाली आणि कोणताही उशीर न करता ते कुटुंबाला भेटण्यासाठी धावून गेले.
(गोविंदाचा महा-डिजास्टर मूव्ही! मिळाली फक्त 1.9 रेटिंग, 20 लाख कमावतानाही आले नाकी नऊ)
रात्री 10 वाजता झालेल्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये गोविंदा भावूक झालेला दिसत आहे. ते शशी प्रभू यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांत्वन देतानाही दिसला. गोविंदा यांच्या या भावनिक कृतीमुळे त्यांचे चाहतेही हळवे झाले आहेत.
गोविंदा आणि शशी प्रभू यांची मैत्री
गोविंदा आणि शशी प्रभू यांच्यात अनेक दशकांपासून घट्ट मैत्री होती. शशी प्रभू हे केवळ त्यांचे सेक्रेटरी नव्हते तर त्यांचे खूप चांगले मित्रही होते. त्यांचे नाते गोविंदा यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनचे होते आणि ते आजतागायत कायम राहिले.
गोविंदाचे दुसरे सेक्रेटरी शशी सिन्हा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते की, “त्यांच्यात सुरुवातीपासूनच खूप जवळीक होती. शशी प्रभू यांनी अनेक वर्षे गोविंदा यांच्यासाठी काम केले.” “ते सुरुवातीपासूनच गोविंदा यांच्यासोबत होते आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांना भावासारखे आधार दिले. गोविंदा यांचे त्यांच्यावर भावासारखे प्रेम होते आणि आजही ते तसेच आहे.”
चाहत्यांकडून श्रद्धांजली
अंतिम दर्शनासाठी त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे जुने फोटो आणि आठवणी शेअर करून शशी प्रभू यांना श्रद्धांजली वाहिली. अनेकांना आठवले की गोविंदा यांच्या यशात शशी प्रभू यांचा मोठा वाटा होता आणि प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगी ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.