
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक होळकर तलावाकाठी श्री स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आला असून या मठात श्री स्वामी समर्थांची पंचधातूची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
श्री स्वामीमय सेवा ट्रस्टच्या वतीने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत स्वामींचा रथ,भागवत संप्रदायाची दिंडी,महादेवाचे तांडव नृत्य,आकर्षक बांड वादन, उंट,घोडे,सहभागी झाले होते.
जेजुरी शहरातील मुख्य चौकात श्री स्वामींच्या मूर्ती वर ग्रामस्थ व स्वामी भक्तांच्या वतीने भंडारा व फुलांची जेसीबी वरून उधळण करण्यात आली.
श्री स्वामीमय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डिखळे,माऊली खोमणे,समितीचे सचिन सोनवणे,सतीश घाडगे,गणेश मोरे,ज्ञानेश्वर मोरे, व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या सोहळ्यानिमित्त दिनांक 31 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे