जेजुरीत जिजामाता संकुलात आजी- आजोबा मेळावा संपन्न!

Photo of author

By Sandhya


जेजुरी :

श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड,संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालय व जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी या शैक्षणिक संकुलात शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी आजी आजोबा आनंद मेळावा संपन्न झाला.
आपल्या नातवंडांचे आईच्या जिव्हाळ्याने व संस्कारच्या शिदोरीने कौतुक करणा-या दोन व्यक्ति म्हणजे आजी आजोबा असतात,तसेच आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांना नोकरी,कामधंदा व शिक्षणासाठी मूळ गावापासून दूर जावे लागते,त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती लोप होत चालली आहे. अशा वेळेस आपल्या आजी आजोबा पासून नातवंडे दूर राहतात,त्यांना त्यांच्या प्रेमापासून व संस्कारांपासून मुकावे लागते तसेच शहरीकरण आणि लहान कुटुंब पद्धतीच्या आजच्या काळात आजी आजोबा हे नाते दुरावत चालले आहे,हे दुरावत चाललेले नाते घट्ट करण्यासाठी जिजामाता संकुलात आजी आजोबा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या आजी आजोबा यांच्या विषयी प्रेम,माया ,आपुलकी मुलांनी सादर केलेल्या कवितांच्या व भाषणातून दिसून आली.
आलेल्या आजी आजोबांचे स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे,पर्यवेक्षक सतिश पिसाळ तसेच छोट्या चिमुकल्यांनी आजी आजोबांचे औक्षण करून आणि गुलाबाच्या पाकळ्यांच्या वर्षावात स्वागत केले.
यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर म्हणाले की,आजी आजोबा वटवृक्षासारखे असतात,त्यांनी अनेक नाती विणलेली असतात,ते कुटुंबाचा पाया व आधार असतात,आजी आजोबांच्या संस्कारामुळे नातवंडे उत्तम प्रकारे घडतात,त्यांच्यामुळे घरपण जपले जाते.संस्कारमय पिढी टिकवून ठेवण्यासाठी आजी आजोबा नातवडांच्या जवळ असणे गरजेचे असते,आजी आजोबा यांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आनंदी राहिले पाहिजे.यावेळी विद्यार्थी व आजी आजोबांनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाला जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी अनिल गौड, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ पेशवे,बापुकाका वीरकर,माणिक पवार,सुहास बारभाई गुरुजी,रजनीताई पेशवे,राहुल भोसले, पदमावती भोसले,मोहन भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतिश पिसाळ,शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे,माध्यमिक विभागप्रमुख बाळासाहेब जगताप, छाया पोटे,सोमनाथ उबाळे,सोनबा दुर्गाडे,पूनम उबाळे, गणेश भंडलकर,राजेंद्र ताम्हाणे, राघू हारुळे,मयूर शिंदे,मोनिका निगडे,पौर्णिमा गायकवाड,ज्योती खारतोडे ,योगेश घोरपडे,अजय जगताप यांनी केले.सूत्रसंचालन सुनिल भगत, वर्षा देसाई यांनी केले.आभार सागर चव्हाण यांनी मानले

Leave a Comment