पुरंदर : चोवीस तास समाजाची सुरक्षितता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे काम करणाऱ्या पोलीस बांधवांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने पुरंदर मेडिकल असोशियशनच्या वतीने जेजुरी पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
पुरंदर मेडिकल असोसिएशन व जेजुरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेजुरी पोलीस स्टेशनच्या मार्तंड सभागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पुरंदर मेडिकल अससिएशनचे अध्यक्ष डॉ प्रवीण जगताप,जेजुरी पोलीस स्टेशनचे स पो नी दीपक वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी,शालेय विद्यार्थी,दिव्यांग यांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी 24 तास ड्युटी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस बांधवांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे शिबिर आयोजित केले असल्याचे असोसिएशनचे सचिव डॉ सुमित काकडे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले.
या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी,हृदयरोग,दंत,मधुमेह, स्त्री आरोग्य तपासणी ,त्वचारोग, आदी आजारांची तपासणी करून औषोधपचार करण्यात आले.
पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रवीण जगताप,उपाध्यक्ष डॉ शमा केंजळे,डॉ सचिन निरगुडे,सचिव डॉ सुमित काकडे, डॉ नितीन केंजळें,डॉ उमाकांत ढवळे,डॉ अस्मिता पोखरणिकर,डॉ वृषाली जगताप,डॉ निनाद खळदकर,डॉ सुनील बोत्रे, डॉ स्वप्नील महाजन ,डॉ संजय गळवे,डॉ प्रदीप मगदूम, डॉ जयश्री होले,आदींनी ही आरोग्य तपासणी केली.