हेमा मालिनी : “भाजपावर सातत्याने टीका करुन जिंकू शकणार नाहीत’

Photo of author

By Sandhya

हेमा मालिनी

भारतीय जनता पक्षावर आणि आमच्या नेत्यांवर सातत्याने टीका करुन विरोधक निवडणुका जिंकू शकणार नाहीत. प्रचारावेळी अशी टीका करत बसण्यापेक्षा तुम्ही जनतेसाठी काय करणार, त्यावर जोर द्या. भाजपवरील टिकेने काही साध्य होणार नाही, असे प्रतिपादन अभिनेत्री, नृत्यांगना हेमा मालिनी यांनी केले आहे.

त्या मथुरा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. वृंदावनमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी केल्यानंतर हेमा मालिनी बोलत होत्या.

यावेळी त्यांनी ‘शोले’ चित्रपटामधील ‘होली के दिन’ हे प्रसिद्ध गाणेही गायले. मथुरामध्ये २६ एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा मथुरामधून आपला उमेदवार उभा केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या संभाव्यतेबद्दल आपले मत शेअर करताना हेमा मालिनी म्हणाल्या की, १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी ४०० च्या पुढे जाईल असा विश्वास आहे.

आमच्या पक्षाने ३७०+ जागांचे लक्ष्य ठेवले आहे आणि एनडीएसाठी ४०० पार करणे’. मला विश्वास आहे की आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. ही दोन्ही उद्दिष्टे आम्ही पूर्ण करू.

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, आमची सर्व निवडणूक उद्दिष्टे साध्य करण्याचा आम्हाला आत्मविश्वास देणारी गोष्ट म्हणजे आमच्या सरकारने पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पूर्ण केलेले काम.

आज देश जिथे आहे, त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आमच्यावर टीका करण्याऐवजी विरोधकांनीही आमचे चांगले काम आणि देशाला पुढे नेण्यासाठी केलेले प्रयत्न स्वीकारून केवळ होळी साजरी करण्यातच नव्हे तर राष्ट्र उभारणीतही सहभागी व्हावे, असे मला वाटते.

Leave a Comment