दौंड | श्री क्षेत्र नारायण महाराज बेटात दत्तभक्तांची अलोट गर्दी!

Photo of author

By Sandhya

दौंड : श्री सद्गुरु नारायण महाराज दत्तसंस्थान बेट केडगाव येथे श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन हे पाच दिवशीय असून, याचा प्रारंभ बुधवार दि.११ डिसेंबर ते सांगता रविवार दि.१५ डिसेंबर असा दिनक्रम आहे. तसेच यामध्ये पहाटे ५ वाजता श्री दत्त यांची महापूजा, सकाळी ८ ते ९ पवमान सुक्त पठण, सायंकाळी ५.३० ते ७ कीर्तन अशा प्रकारे हा परिसरात सर्वदूर भक्तिमय वातावरणात मग्न झालेला असतो.

श्री क्षेत्र नारायण महाराज बेट येथे श्री सद्गुरू नारायण महाराज हे सण १८८५ ते १९४५ या कालावधीमध्ये त्यांचे वास्तव या ठिकाणी होते. दत्तमूर्तीची स्थापना त्यांनी १९१३ साली वैशाख प्रतिपदा ते पंचमी यादरम्यान केली आहे.

नारायण बेट येथे दि.१४ डिसेंबर रोजी दत्त जन्म सोहळा हा मोठ्या उत्साहात दिमाखात साजरा केला जातो व दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी केले जाते. साधारण पंचक्रोशीतून २००० ते ३००० भक्त या ठिकाणी हजेरी लावत असतात अशी माहिती यावेळी श्री सद्गुरु नारायण महाराज दत्तसंस्थान बेट केडगावचे सचिव केदार अगस्ती दैनिक संध्या रिपोर्टर संजय सोनवणे यांच्याशी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्य विश्वस्त संजय शितोळे, विठ्ठल रायरीकर, सुनील बेलसरे, प्रफुल्ल इनामदार, मोरेश्वर जोशी, हरिष वरळीकर हे उपस्थित होते.

Leave a Comment