253 रक्तदात्यानी केले रक्तदान
जेजुरी : देशाचे लोकनेते शरद पवार यांच्या 85 व्यां वाढदिवसाचे औचित्य साधून जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने सलग पाचव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जेजुरी औद्योगिक वसाहतीतील 253 कामगारांनी व विशेषतः महिला कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
दरवर्षी जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.औद्योगिक वसाहतीतील पद्मभूषण शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुलात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ पासूनच उत्स्फूर्त पने कामगार,उद्योजकांनी रक्तदानासाठी मोठा प्रतिसाद दिला.
1980 साली शरद पवार यांनी जेजुरीत एम आय डी सी ची स्थापना केली, सध्या येथे 180 लहान मोठे कारखाने सुरू असून सुमारे 10 हजार कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.लोकनेते शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे,माजी आमदार संजय जगताप यांनी नेहमीच उद्योग विकास व वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे. पवार साहेब च्या ऋणातून उतराई होण्यासाठी दरवर्षी जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक सचिन सोनवणे,सुधीर गोडसे,महेश काळे आदी उपस्थित होते.
या शिबिराचे नियोजन जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे,कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,पदाधिकारी पांडुरंग सोनवणे,राजेश पाटील,शकील शेख,अनंत देशमुख,संभाजी जाधव,सुयश जोशी,रौनक सर माने,मुस्ताक शेख,वसीम शेख,सुजित राणे,प्रशांत लाखे,व्यवस्थापक जालिंदर कुंभार आदींनी केले.