
भारतीय स्केटिंग संघाची कर्णधार,महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती अवार्ड विजेती,व वर्ल्ड चॅम्पियन स्केटिंग खेळाडू ऋतीका सरोदे,तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिप स्केटिंग काष्य पदक विजेती वैद्यही सरोदे यांचा श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी तसेच जिजामाता महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
पुणे येथील ऋतिका सरोदे हिने दहा वर्षे सलग राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने तिला शिवछत्रपती अवार्ड देवून सन्मानित करण्यात आले. ऋतिकां सध्या भारतीय स्केटिंग संघाची कर्णधार असून सप्टेंबर मघ्ये इटली येथे झालेल्या रोलर डर्बी स्केटिंग स्पर्धेत ऋतिका आणि वैदेही कास्या पदक मिळवून भारताला या स्पर्धेत प्रथमच पदक मिळवून दिले.
ऋतिका आणि वैदेही यांनी सोमवार दिनांक 6 रोजी जेजुरी गडावर येवून खंडोबा देवाचे दर्शन घेतले.तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले पदक देवाला अर्पण केले.
जेजुरी गडावर श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने दोघींचा सत्कार मराठी नाट्य क्षेत्रातील अभिनेत्री प्रज्ञा जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर,डॉ अर्पिता एडके,बाल कलावंत दर्श खेडेकर उपस्थित होते.
देवदर्शना नंतर जेजुरी येथील जिजामाता महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते ऋतिका व वैदेही हीचा सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध खेला बाबत माहिती व प्रोत्साहन मिळावे या हेतूने जिजामाता महाविद्यालयात या दोघींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना ऋतिका सरोदे हिने खेळाने अभ्यासाचे नुकसान होत नाही.शिक्षणा बरोबरच खेळात प्रावीण्य मिळविता येते. देशासाठी खेळायला मिळते हा सर्वात भाग्याचा क्षण आहे असे सांगितले.
ऋतिका आणि वैदेही या दोघींना भारत देशाकडून ओलंपिक मध्ये खेळण्याची संधी मिळावी अशा शुभेछ्या प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिल्या. यावेळी डॉ राजेंद्र खेडेकर,अभिनेत्री प्रज्ञा जावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे, सतीश पिसाळ,प्रल्हाद गिरमे, सोमनाथ उबाळे,सागर चव्हाण आदींनी केले.