जनरल निरीक्षक बिद्यानंद सिंग यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा घेतला आढावा

Photo of author

By Sandhya

Inspector General Bidyanand Singh reviewed the Baramati Assembly by-elections

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक दि. २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून, त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नियुक्त जनरल निरीक्षक बिद्यानंद सिंग यांनी तहसिल कार्यालय बारामती येथे बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेतला.
बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून निवडणुकीची पूर्वतयारी, कायदा व सुव्यवस्था, भरारी पथक (FST) व स्थिर देखरेख पथक (SST) यांचे नियोजन, तसेच आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत तपशीलवार माहिती घेण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
बारामती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी अथवा सूचना असल्यास जनरल निरीक्षक बिद्यानंद सिंग (मो. ७६६६६३९८५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page