
आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (२८ मे) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सया यांच्यात हाेणार हाेता. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजेच आज (दि.२९) खेळवण्यात येणार आहे. असा हा सामना रंगणार आहे.
दरम्यान, या अंतिम सामन्याबाबत एक माेठी अपडेट समाेर आली आहे. सोमवारी दुपारी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान ४० ते ५० टक्के पाऊस पडण्याची शक्यता होती. त्यामुळे सामना उशीरा सुरु झाला असता.
मात्र, गेल्या काही तासांत नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण बदलले आहे. त्यामुळे पूर्ण सामना खेळवला जाण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.
सध्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तापमान ३१ ते ३५ अंश सेल्सियसच्या आसपास आहे. खेळादरम्यान ९० टक्क्यांहून अधिक ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज देखील सामना पावसामुळे खेळवण्यात आला नाही. तर गुजरात टायटन्सला विजयी घोषित करण्यात येणार आहे. कारण गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. तर चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता.