
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे डोळे पाणावले. निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील 28 राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा आहेत. यापैकी 23 राज्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे.
देशातील जवळपास सर्वच संवैधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
या निकालाचा सविस्तर अभ्यास करून आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल, याची आम्हाला खात्री आहे, असे जयंत पाटील म्हणाले