जयंत पाटील : आरक्षणावरून मराठा-ओबीसींचा खेळण्यासारखा वापर…

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

 मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सर्व समाजाला आरक्षणावरून खेळवले जात आहे. आपला खेळण्यासारखा वापर होतोय. त्यामुळे मराठा व ओबीसी या दोन्ही समाजात अस्वस्थता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

महाराष्ट्राचा बिहार झाला आहे, असेही ते म्हणाले. आ. पाटील माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने छगन भुजबळ यांच्या पेकाटात लाथ घालून त्यांना घालवले पाहिजे, अशा पद्धतीची भाषा वापरली आहे.

सत्तेत असणार्‍या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी त्या आमदाराला वास्तविक समज द्यायला हवी अथवा काढून टाकले पाहिजे होते. मंत्रिमंडळामधील मंत्र्यालाच पेकाटात लाथ घालायची भाषा करत असतील, तर हे दुर्दैवी आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page