जयंत पाटील : “भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही”; ‘खंडणी’ शब्दावरुन आरोप…

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सर्व पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल मुलाखतीत राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरतमध्ये खंडनी वसूल केली असं विधान केलं. यावर भाजपाने आक्षेप घेतला असून जयंत पाटील यांनी माफी मागण्याची मागणी केली. यावर आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत स्पष्टीकरण दिले आहे.

आज माध्यमांसोबत बोलताना जयंत पाटील यांनी इतिहासातील काही दाखले दिले आहेत.यावेळी भाजपाला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपाला इतिहास माहित नसल्याचे सांगत टोला लगावला.

माध्यमांसोबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपाला इतिहास माहित नाही. यापूर्वी अनेकांनी त्याच वर्णन कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चरित्र लेखमालेत उल्लेख केला आहे. दुसऱ्यांदा सूरत लुटली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सूरतेच्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलं.

प्रतिवर्षी १२ लाख रुपये खंडणी बिनभोट पावती केली, तर तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भिती उरणार नाही. शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलय. हे भाजपावाले काय सांगतात. यांना इतिहास माहित नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला.  यावेळी जयंत पाटील यांनी इतिहासातील दाखले देत भाजपाला प्रत्युत्तर दिले.

“छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरत काबीज केली, हातात ठेवली असं झालं नाही. महाराज तिथे गेले हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणची सगळी लूट एकत्र करुन परत आणली. चार पाच दिवस फार कमी काळ तिथे होते. कारण औरंगजेबाच्या सैन्याने तिथे येऊन प्रति हल्ला केला असता. या सगळ्याचा विचार करुन तिथे गेले. आपलं सगळं साध्य करु ते परत आले. मला वाटतं भाजपाचा इतिहास कच्चा आहे. त्यांनी आधी ते वाचावे, असंही पाटील म्हणाले.

Leave a Comment