सर्व उद्योग राज्याबाहेर नेले जात आहेत. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. ड्रग्ज माफियांना आश्रय मिळत आहे. राज्यात सध्या उडता महाराष्ट्र अशी स्थिती झाली आहे.
बलात्कारांच्या गुन्ह्यात चौथा तर खूनांच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. याकडे गृहखात्याचे लक्ष नाही, महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार कमी पडत आहे,
यावर बोलले, तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते विधानसभेत बोलत होते.