जेजुरी | गुणवत्ता संवर्धन अभियाना अंतर्गत जिजामाता हायस्कूलची तपासणी

Photo of author

By Sandhya


जेजुरी :-
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे,या अभियाना अंतर्गत श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयाची शालेय तपासणी जेजुरी बीड चे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल जगदाळे,पथक प्रमुख, न्यू इंग्लिश स्कुल जवळार्जुनचे प्राचार्य उत्तमराव निगडे, माध्यमिक विद्यालय यादववाडीचे मुख्याध्यापक दिलीपराव नेवसे,राजेंद्र जाधव, सेकण्डरी बँक मुंबईचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, माध्यमिक विद्यालय वनपुरीचे सहशिक्षक दत्तात्रय रोकडे, योगेश घोडके, केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज काळदरी या विद्यालयाचे लेखनिक राजेंद्र जाधव यांनी केली.

आलेल्या टिमचे स्वागत महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य राज्य सचिव, विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले.
यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर यांनी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या विषयी माहिती सांगितली. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले की,पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवत्तेची दरी कमी करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबवले त्याबद्दल त्यांचे आभार मानले, तसेच ते पुढे म्हणाले की शालेय शैक्षणिक जगतामध्ये गुणवत्तेचे संवर्धन करणे ,शाळांची क्षमता संवर्धन वृद्धीगत करणे, शाळा शाळांमध्ये असणाऱ्या उनिवा दूर करणे, शिक्षक आणि शाळेचे कार्य या निमित्ताने परिचित करून देणे हा अभियानाचा हेतू असल्याचे सांगितले, २२ व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, शैक्षणिक लाभाच्या योजना पात्र विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे, शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण बनवणे, कृतीयुक्त शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाटचालीसाठी शाळांना प्रेरित करणे, स्वच्छता आरोग्य व वाचन विषयक संस्कार कायमस्वरूपी विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे, प्राप्त विद्यार्थ्यांना लाभाच्या योजना पर्यंत पोहोचविणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, शिक्षण विभाग व शाळा यांचा समन्वय दृढ करणे, डिजिटल लाईझ स्कूल बनवने, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शाळांमधील उपक्रम इतर शाळा व प्रशासनास माहित करून देणे अशी या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

सदर तपासणी तालुका तसेच जिल्हास्तरावर ग्रामीण व शहरी व्यवस्थापनाच्या विद्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे, प्रत्येक तालुक्यातून माध्यम, गट व विद्यार्थी संख्येनुसार केलेल्या गटातून प्रथम तीन क्रमांकाच्या शाळा निवडल्या जाणार असून त्या सर्व शाळा जिल्हास्तर स्पर्धेसाठी पात्र राहणार आहेत, गटनिहाय प्रथम तीन क्रमांकाच्या शाळा शहर तालुकास्तरावर पारितोषिकास पात्र ठरणार आहेत.
कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ,बाळासाहेब जगताप,सोमनाथ उबाळे यांनी केले.

Leave a Comment