जेजुरी पोलीस स्टेशन कडून गुन्ह्यातील जप्त केलेले दागिने व रक्कम फिर्यादीना परत. 

Photo of author

By Sandhya

आरोपी कडून जप्त केलेला मुद्देमाल खर तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच फिर्यादी परत केला जातो.मात्र ज्याची चोरी झाली आहे त्यांना एका विशिष्ठ कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून चोरी गेलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनच्या माध्यमांतून दिला जातो. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने 15 फिर्यादीना 1लाख वीस हजार रुपये रोख व साडे सहा लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने परत देण्यात आल्याचे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले. 
जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये शुक्रवार दिनांक 13 रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय मल्हार मुंडलिक रा जेजुरी , शुभम कृष्णकुमार दुबे रा जेजुरी, दीपक माणिकराव कोंडे रा गुळूंचे , श्रीमती अलका पोपटकर , रा गुळूंचे , चंपकलाल यशवंत आडसुळ रा पिंपरी खुर्द , रंगवाई बापू केसकर रा खोर , तुषार चंद्रकांत खैरे रा कोथळे , जनार्धन अनंत शिवडीकर रा वरळी कोळीवाडा मुंबई आम्रपाली अरुणवेद पाठक रा निरा ,शिवाजीराव काकडे रा निंबूत ,राणी बाळू चव्हाण रा पिसुटी, सतीश तात्याबा थोरात रा खुटगाव तालुका दौंड शशिकला संजू चव्हाण, रा कल्याण ठाणे , सतीश हनुमंत बिराजदार रा लातूर , असलम नसेल खान पठाण रा सूकलवाडी तालुका पुरंदर यांना 1 लाख वीस हजार रुपये रोख रक्कम व 6 लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोनं चांदीचे दागिने परत करण्यात आले. 
आपले चोरीला गेलेले दागिने व पैसे विनासायास परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे,पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी,नामदेव तारडे,रूपाली पवार आदींनी हा उपक्रम राबविला. 

 

Leave a Comment

You cannot copy content of this page