जेजुरी येथील नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काढून टाकण्यात आलेल्या पुतळ्याचे काम, नवीन जागेत शासनाच्या खर्चाने तात्काळ सुरु करण्यात यावे या मागणीसाठी, पुरंदर तालुक्यातील शिव शाहू फुले आंबेडकर प्रेमी व विविध सामाजिक पक्ष संघटनेच्या वतीने गुरुवारी दिनांक 9 रोजी जेजुरी नगरपरिषद कार्यालय समोर जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
शासकीय खर्चातून तातडीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा. डॉ आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी विलंब झाल्यास प्रांतिक उपोषणाचा इशारा शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीचे नेते विष्णुदादा भोसले यांनी दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील शिव शाहू फुले आंबेडकर प्रेमी यांच्या व भिमानुयायी यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी शिव शाहू,फुले आंबेडकर चळवळीचे नेते सुनील धीवार,अविनाश भालेराव व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते