![झोपेत रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2023/04/Untitled-design-2023-04-21T234108.816.png)
सीताबर्डी ठाण्याच्या हद्दीत पहाटे साडेपाचच्या सुमारास एका ऑटोचालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सीताबर्डी ठाण्याच्या हद्दीत हनुमान गल्लीतील गुजरात लॉजसमोर शुक्रवारी पहाटे हत्येची ही घटना समोर आली.
राजकुमार यादव (वय ५०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, संशयित आरोपीचा शोध सुरू असून व्हिडिओ फुटेज पाहून त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांनी दिली.
आटोचालक राजकुमार झोपेत असतानाच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने या घटनेत एका संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
या दोघांनी सोबत दारू ढोसली व नंतर डोक्यात दगड घातल्याचे सीसीटीव्हीत दिसत असल्याची माहिती असून त्याला आसपासचे कुणी ओळखत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच व्यक्तीने राजकुमार झोपेत असताना त्याचे डोके दगडाने ठेचून त्याची हत्या केली आहे. या हत्येच्या मागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून सीताबर्डी पोलीस या दिशेने तपास करीत आहेत.