खा. मुरलीधर मोहोळ : पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरविणार…

Photo of author

By Sandhya

खा. मुरलीधर मोहोळ

पुणेकरांनी विकासाला, विचाराला आणि भविष्याला डोळ्यासमोर ठेवून मतदान केले आणि माझ्यावरही विश्वास व्यक्त केला, पुणेकरांचा हा विश्वास सार्थ ठरवून देशातील सर्वोत्तम शहर घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे विजयी उमेदवार, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी विजयानंतर व्यक्त केला.

मोहोळ म्हणाले, मी पुणेकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि महायुतीला चांगला विजय मिळवून दिला. आम्ही चांगल्या पध्दतीने निवडणूक लढलो, पुणे सुस्कृंत शहर आहे. ते विकासाला आणि विचाराला मतदान करतात.

या निवडणुकीत विरोधी पक्षाने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. व्यक्तीगत पातळीवर टीका केली. पण पुणेकरांनी त्याला दाद दिली नाही.

हा विजय महायुतीमधील सर्व घटक पक्षांचा सामूहिक विजय आहे, बूथ पातळीवर काम केलेल्या आणि एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी उपलब्ध करून देणे हे केवळ भाजपमध्येच घडू शकते अशी भावना मोहोळ यांनी या वेळी व्यक्त केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page